मालवणी फिश करी | Malvani Fish Curry Recipe in Marathi

Malvani Fish Curry Recipe In Marathi

आपला महाराष्ट्र ज्या पद्धतीने संस्कृतीच्या बाबतीत अग्रेसर आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील पाककृती देखील विश्व प्रसिद्ध आहेत. याच प्रसिद्ध पाककृतींपैकी एक आहे मालवण ची प्रसिद्ध मालवणी फिश रस्सा करी.

मालवणी फिश करी स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यात मालवणी मसाला वापरला जातो. या करीमध्ये आंबट घटक देण्यासाठी कोकमचा रस देखील जोडला जातो. मालवणी मसाला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण भागातून संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेला आहे. या लेखात आम्ही आपल्यासाठी मालवण ची प्रसिद्ध आणि चविष्ट मालवणी करी कशी बनवायची या विषयी चे मार्गदर्शन करणार आहोत. अतिशय सोपी आणि फटाफट बनणारी ही चविष्ट डिश प्रत्येकाने एकदा तरी बनवायला हवी.

मालवणी फिश करी कृती:

Malwani Fish Curry

Malvani Fish Curry Recipe in Marathi | मालवणी फिश करी

Priya Gajjar
मला माझी मालवणी फिश करी, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील मसालेदार आणि तिखट नारळावर आधारित करीची रेसिपी सांगताना खूप आनंद होत आहे. ही अस्सल डिश ताजी मासे, सुगंधी मसाले आणि चिंचेचा फोडणी देऊन बनवली जाते.
Prep Time 15 minutes
Cook Time 30 minutes
Total Time 45 minutes
Cuisine Indian
Servings 2
Calories 325 kcal

Ingredients
  

 • दोन मासे
 • अर्धा चिरलेला कांदा
 • अर्धा कापलेला टमाटा
 • कोथिंबीर दोन चमचे
 • मीठ
 • तेल
 • आलं
 • लसूण
 • कढीपत्ता
 • त्रिफळा
 • ओले खोबरे किस
 • कोकम रस
 • तांदूळ

Instructions
 

 • फिश करी बनवण्यासाठी सर्वात आधी कापलेले मासे स्वच्छ पाण्यात चांगल्या पद्धतीने धुवून घ्यावे. यानंतर माशांचे तुकडे बाजूला काढून उरलेले पाणी फेकून द्यावे.
 • सर्वात आधी आपल्या फिश करी चा मसाला बनवायचा आहे. हा मसाला बनवण्यासाठी आलं, लसूण आणि कोथिंबीर ची पेस्ट, बारीक चिरलेले कांदे, चिरलेले टमाटे, कढीपत्ता, किसलेले ओले खोबरे, एक चमचा मीठ, एक चमचा धने पावडर, एक चमचा जिरे पावडर, पाव चमचा हळद, दोन चमचे तिखट, एक ते दोन तास आधी वाटीत भिजत घातलेले काही तांदूळ आणि थोडे पाणी इत्यादी गोष्टी मिक्सरच्या भांड्यात एकत्रित कराव्यात.
 • यानंतर काही मिनिटे मिक्सरवर सर्व पदार्थ बारीक करून घ्यावेत. मसाला चांगल्या पद्धतीने बारीक झाल्यावर त्याला एका भांड्यात काढावे.
  मालवणी फिश करी कृती - यानंतर काही मिनिटे मिक्सरवर सर्व पदार्थ बारीक करून घ्यावेत. मसाला चांगल्या पद्धतीने बारीक झाल्यावर त्याला एका भांड्यात काढावे.
 • फिश करी बनवण्यासाठी गॅस सुरू करून गॅसवर एक भांडे ठेवावे, या भांड्यात एक ते दोन चमचे तेल घालावे. तेल थोडेफार उकळू लागल्यावर त्यात अर्धा कांदा घालावा. थोडा वेळ कांदा चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावा.
  मालवणी फिश करी कृती - फिश करी बनवण्यासाठी गॅस सुरू करून गॅसवर एक भांडे ठेवावे, या भांड्यात एक ते दोन चमचे तेल घालावे. तेल थोडेफार उकळू लागल्यावर त्यात अर्धा कांदा घालावा. थोडा वेळ कांदा चांगल्या पद्धतीने भाजून घ्यावा.
 • कांदा भाजून झाल्यानंतर यात माशांचे केलेले तुकडे टाकावेत. यानंतर भांड्यात अर्धा चमचा तिखट टाकावे. व सोबत सुरुवातीला मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला देखील ओतावा. थोडा वेळ हलक्या हाताने चमच्याच्या मदतीने भाजी हलवावी.
  मालवणी फिश करी कृती - कांदा भाजून झाल्यानंतर यात माशांचे केलेले तुकडे टाकावेत. यानंतर भांड्यात अर्धा चमचा तिखट टाकावे. व सोबत सुरुवातीला मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला देखील ओतावा. थोडा वेळ हलक्या हाताने चमच्याच्या मदतीने भाजी हलवावी.
 • यानंतर बाजूच्या गॅस वर दुसऱ्या भांड्यात अर्धा तांब्या पाणी घ्यावे व या पाण्यात काही त्रिफळा टाकून पाणी चांगल्या पद्धतीने उकडून घ्यावे. 10 ते 15 मिनिटे पाणी उकडल्यानंतर हे पाणी गाळणी च्या मदतीने व्यवस्थित गाळून घ्यावे व गाळलेले पाणी फिश करी मध्ये टाकावे. पाणी जास्त प्रमाणात टाकू नये अन्यथा करी पातळ होऊ शकते.
 • करी उकडण्याआधी त्यात अर्धी वाटी कोकम चा रस टाकावा. व पाच ते दहा मिनिटे उकडल्यानंतर गॅस बंद करावा.
  मालवणी फिश करी कृती - करी उकडण्याआधी त्यात अर्धी वाटी कोकम चा रस टाकावा. व पाच ते दहा मिनिटे उकडल्यानंतर गॅस बंद करावा.
 • या दरम्यान आवश्यकतेनुसार थोडे थोडे पाणी टाकावे. परंतु करी अधिक पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
 • करी उकळत असतांना त्यावर झाकण लावून ठेवावे. यादरम्यान आपण करी मधील मिठाचे प्रमाण, मिरची इत्यादी गोष्टी तपासात राहू शकतात व आवश्यकतेनुसार त्यांचे प्रमाण वाढवू शकता.
 • मालवणी फिश करी ताटात गरमागरम सर्व्ह करावी. करी सोबत तांदळाचा भात, सलाद म्हणून कांदे, लोणचे इत्यादी गोष्टी सर्व्ह केल्या जाऊ शकतात. मालवणी फिश करी आपण पोळी किंवा भातासोबत खाऊ शकतात.
 • मालवणी फिश करी आपल्यासाठी एक उत्तम लंच अथवा डिनर म्हणून उपयोगी ठरू शकते. सुट्टीच्या अथवा एखाद्या खास दिवशी आपण ही करी घरात बनवू शकतात.
  Malwani Fish Curry

Video

Notes

काही महत्वाच्या गोष्टी

 • करी मधील सर्वात महत्वाचे पदार्थ म्हणजे मसाला. म्हणून करी साठीचा मसाला बनवीत असताना त्यावर विशेष लक्ष द्यायला हवे. मसाल्यात टमाटे, कांदे, लसूण, आलं, कढीपत्ता, खोबरे कीस इत्यादी ज्या ज्या गोष्टी शक्य होतील त्या नक्की टाकाव्यात.
 • चविष्ट अन्न कधीही घाईत बनत नाही. म्हणून जर तुम्हाला करी ची उत्तम चव हवी असेल तर घाई करणे टाळावे. अनेक जण घाई घाईत गॅस वाढवून लवकरात लवकर करी बनवण्याचा प्रयत्न करतात. परंतु चांगला स्वाद हवा असेल तर करी ही कधीही हलक्या अथवा मध्यम आचेवर बनवायला हवी.
 • कोणत्याही डिश वर गार्निशिंग केल्याने त्या डिश ला एक वेगळा स्वाद मिळतो. म्हणून करी तयार झाल्यावर आपण तिला कोशिंबीर, पत्ताकोबी इत्यादी द्वारे गार्निश करू शकतात.
 • करी अथवा इतर कोणतीही डिश बनवत असताना पाणी हळुवार थोडे थोडे करून टाकावे. अनेकदा घाईत असताना काही लोक अत्याधिक प्रमाणात पाणी टाकून देतात ज्यामुळे करी चा स्वाद बिघडू शकतो.
Keyword Maharsthrian Style Malvani Fish Curry

शेवट

तर मंडळी आजच्या या लेखात आम्ही आपल्यासोबत मालवणी फिश करी कशी बनवावी याबद्दलची माहिती शेअर केली. आणखी एक महत्त्वाची टीप म्हणजे करी मध्ये मासे टाकतांना थोड्या उशिरा टाकावे. यामागील कारण म्हणजे मासे हे नाजूक असतात व ते लवकर शिजतात. जर आपण सुरुवातीलाच मासे टाकत असाल तर ते अधिक शिजल्याने, त्यांचा स्वाद बदलू शकतो.

जर आपणही ही करी बनवून पहिली असेल तर आपले अनुभव कमेन्ट द्वारे नक्की शेअर करा. आपले काही प्रश्न असतील तर ते देखील आपण आम्हाला कमेन्ट करून विचारु शकतात.

करी ला आणखी चविष्ट कशी बनावत येईल?

करीच्या स्वादात आणखी वाढ करण्यासाठी तुम्ही त्यात मध, साखर इत्यादी गोष्टी टाकू शकतात. ज्यामुळे तुमच्या करी मध्ये गोडवा येईल.

करी मध्ये दूध टाकले जाऊ शकते का?

भारतीय करी मध्ये दही आणि आंबट मलई टाकली जाते. पण जर आपण उष्णतेने त्रस्त असाल तर करी मध्ये दूध देखील टाकू शकतात. यामुळे तुम्हाला एक नवीन स्वाद अनुभवण्यास मिळेल.

करी तिखट कशी बनवावी?

अनेकांना अत्याधिक तिखट खाण्याची सवय असते. करी अथवा इतर कोणताही पदार्थ तिखट हा त्यात असलेले मसाले आणि मिरची मुळे होतो. म्हणून जर आपण करी तिखट करू इच्छिता तर त्यात नेहमीपेक्षा थोड्या जास्त प्रमाणात तिखट मिरची टाकू शकतात.

करी किती वेळेपर्यंत संग्रहित केली जाऊ शकतात?

करी जास्त वेळ संग्रहित करून ठेवू नये. फ्रीज मध्ये अधिक काळापर्यंत ठेवल्यास करी चा स्वाद बदलू शकतो. म्हणून आवश्यकता असेल तेवढीच करी बनवावी. परंतु स्टोअर करणे अति आवश्यक असल्यास आपण 1 ते 2 दिवसांपर्यंत फ्रीज मध्ये स्टोअर करू शकतात.

करी खाणे शरीरासाठी चांगले आहे का?

करी मध्ये मासे, मटन व भाजीपाल्याचा समावेश केलेला असतो. जे शरीरातील प्रोटीन ची कमतरता भरून काढते. म्हणून करी खाणे तुमच्या शरीरसाठी चांगले ठरू शकते.

1 thought on “मालवणी फिश करी | Malvani Fish Curry Recipe in Marathi”

Leave a Comment

Recipe Rating