नॉन वेज खाण्याची आवड असणाऱ्या जवळपास प्रत्येकानेच चिकन बिर्याणी कधी न कधी खाल्लीच असेल. परंतु हॉटेल मध्ये मिळणारी सेम टू सेम स्वाद असणारी स्वादिष्ट आणि अनेक प्रोटीन्स ने भरलेली चिकन बिर्याणी आपण घरच्या घरी फार सोप्या पद्धतीने बनवू शकतात.
चिकन बिर्याणी कशी बनवायची हा जर आपला प्रश्न असेल आणि आपण देखील जर चिकन बिर्याणी रेसीपी शोधत असाल, तर या लेखात आम्ही आपल्यासाठी Chicken Biryani Recipe in Marathi घेऊन आलेलो आहोत. ही चिकन बिर्याणी बनवण्याची सोपी रेसीपी आपण नक्की एकदा ट्राय करावी.
चिकन बिर्याणी कशी बनवायची (कृती)
घरच्या घरी स्वादिष्ट चिकन बिर्याणी कशी बनवायची हा आपला प्रश्न असेल तर चिकन बिर्याणी ची रेसिपी (Chicken Biryani Recipe in Marathi) पुढील प्रमाणे आहे.
मसालेदार चिकन बिर्याणी | Spicy Chicken Biryani Recipe In Marathi
Ingredients
- 500 ग्रॅम चिकन
- 1/2 कप दही
- 2 चमचे मिरची पावडर
- 1 चमचा हळद
- 2 मोठा चमचा लसुन आणि आल्याचे पेस्ट
- चवीनुसार मीठ
- 1.5 लिटर पाणी
- 2 दालचिनी
- 1 लॉंग
- 3 काळी मिरी
- 1 तमालपत्र
- 3 चमचे तेल
- 500 ग्रॅम बासमती तांदूळ
- 4 चिरलेले कांदे
- 1 चमचा जिरे
- 2 कापलेल्या हिरव्या मिरच्या
- 3 टमाटे कापलेले
- 1 चमचा गरम मसाला
- 2 चमचे बिर्याणी मसाला
- पुदिन्याची पाने
- कोथिंबीर
Instructions
- स्वादिष्ट चिकन बिर्याणी बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात स्वच्छ धुतलेले 500 ग्रॅम चिकन घ्यावे. यानंतर यात अर्धा कप दही घालावे. वरून एक लहान चमचा लाल मिरची पावडर टाकावे. यानंतर अर्धा चमचा हळद पावडर टाकावी. एक चमचा लसूण आणि आल्याचे मिक्सरमध्ये तयार केलेले पेस्ट टाकावे. यानंतर चवीनुसार मीठ घालावे.
- आता काही वेळ हे सर्व मिश्रण उत्तम रित्या चमच्याच्या साह्याने एकत्रित करून घ्यावे. आता एका तासासाठी हे सर्व मिश्रण मॅरीनेट होऊ द्यावे. यादरम्यान आपण इतर कृती करू शकता.
- जोपर्यंत चिकन मॅरीनेट होत आहे तोपर्यंत आपणास तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत, यासाठी गॅसवर एक कढई ठेवावी. कढाईत अर्धा लिटर पाणी टाकावे. या पाण्यात दोन दालचिनी च्या काळ्या टाकाव्यात. यानंतर एक लाँग टाकावी. तीन काळी मिरी टाकावी. एक तमालपत्र टाकावे आणि त्यावर चवीनुसार मीठ घालावे. यानंतर कढई वरील या पाण्यात तीन मोठे चमचे तेल टाकून चमच्याच्या मदतीने सर्व पाणी व टाकलेले पदार्थ एकमेकात हलवून घ्यावे.
- पाणी काही प्रमाणात गरम झाल्यावर, जवळपास 500 ग्रॅम स्वच्छ धुतलेला बासमती तांदूळ कढईत टाकावा. आणि चमच्याच्या मदतीने तांदूळ, पाणी आणि कढईतील इतर पदार्थ 10 मिनिटांपर्यंत एकत्रित करावे.
- ज्यावेळी तांदूळ 80 टक्क्यापर्यंत शिजून जातील तेव्हा गॅस बंद करून कढई उचलून बाजूला करावी.
- आता कांदे तळण्यासाठी एका दुसऱ्या कढई ला गॅस वर ठेवावे आणि कढईत तीन मोठे चमचे तेल टाकावे. यानंतर वरून एक बारीक चिरलेला कांदा टाकावा. आता जोपर्यंत कांदे लाल आणि कुरकुरीत होत नाही तोपर्यंत त्यांना तळत राहावे. कांदे लाल झाल्यानंतर त्यांना पुढील वापरासाठी थोडा वेळ बाजूला ठेवावे.
- आता चिकन चा मसाला तयार करण्यासाठी आणखी एक कढई गॅसवर ठेवून त्यात अर्धा कप तेल टाकावे.
- यानंतर तेलात एक चमचा जिरे टाकावे. वरून तीन बारीक चिरलेले कांदे टाकावे. व एका मिनिटा पर्यंत हे कांदे तळून घ्यावेत.
- कांदे तळून झाल्यावर त्यात दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकाव्यात.
- यानंतर 2 मोठा चमचा आले आणि लसणाचे मिक्सरमध्ये तयार केलेले पेस्ट टाकावे.
- आता परत एकदा चमच्याच्या साह्याने सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यावे. यानंतर वरून तीन बारीक चिरलेले टमाटे टाकावे. व जोपर्यंत टमाटे मऊ होत नाही तोपर्यंत त्यांना आचेवर तळत राहावे.
- त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर टाकावे आणि अर्धा चमचा हळद देखील टाकावी. वरून 1 चमचा गरम मसाला देखील टाकायचे आहे आणि चवीनुसार मीठ देखील घालायचे आहे.
- जर आपल्याकडे चिकन बिर्याणीचा मसाला उपलब्ध असेल तर दोन चमचे चिकन बिर्याणी मसाला टाकावा. आता तव्यातील सर्व पदार्थ चमच्याच्या साह्याने एकमेकात मिक्सचर करून घ्यावेत.
- काही वेळ सर्व मिश्रण एकत्रित मिसळल्यानंतर आपण सुरुवातीला मॅरीनेट केलेले चिकन वरून टाकावे. आता चिकन आणि मसाला एकमेकात मिसळून घ्यावा. जेणेकरून सर्व मसाला चिकनला व्यवस्थित लागून जाईल.
- गॅसवर ठेवलेले चिकन पंधरा मिनिटांपर्यंत शिजू द्यावे. 15 मिनिटे पूर्ण झाल्यावर व चिकन व्यवस्थित शिजल्यावर गॅस बंद करावा.
- आता शिजलेले चिकन एका दुसऱ्या कढईत काढून घ्यावे.
- व सुरुवातीला शिजवलेला बासमती तांदूळ चिकन मध्ये टाकावा.
- वरून लाल तळलेले कुरकुरीत कांदे टाकावे. त्यावर पुदिन्याची पाने टाकावी.
- आणि कढईवर झाकण झाकून पाच मिनिटांपर्यंत हलक्या आचेवर शिजु द्यावे. पाच मिनिटानंतर झाकण उघडून चमच्याच्या साह्याने भात आणि चिकन एकमेकात मिक्स करून घ्यावे.
- ज्यावेळी चिकन, मसाला आणि भात एकामेकांना लागून एकमेकात मिसळून जातील तेव्हा तुम्ही ही चिकन बिर्याणी ताटात सर्व्ह करू शकता. गरमागरम ताटात लावलेली चिकन बिर्याणी सजवण्यासाठी वरून कोथिंबीर टाकली जाऊ शकते. कोथिंबीर निघालीस केलेली चिकन बिर्याणी दिसायला तर छान असतेच परंतु यामुळे तिचा स्वाद देखील वाढतो.
तर अशा अतिशय सोप्या पद्धतीने घरच्या घरी चिकन बिर्याणी बनवली जाऊ शकते.
तर मंडळी या लेखात आम्ही आपल्यासाठी घरच्या घरी कमीत कमी साहित्य वापरुन चिकन बिर्याणी कशी बनवायची (Chicken Biryani Recipe in Marathi) या विषयी चे मार्गदर्शन केले आहे. या लेखातील चिकन बिर्याणी रेसीपी इन मराठी ही पाककलेतील तज्ञ मंडळी द्वारे लिहिण्यात आलेली असून या रेसीपी द्वारे बनवण्यात आलेली चिकन बिर्याणी खरोखर खूप चविष्ट बनते.
जर आपण देखील वरील रेसीपी वापरुन चिकन बिर्याणी बनवली असेल तर आपला अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा.