पूर्वी लग्नातील हळदीच्या दिवसाचा मेन्यू म्हटला म्हणजे मसाले भात, शिरा आणि मठ्ठा ठरलेलाच असायचा. आज जरी लग्न मंडपातून हा मसाले भात कमी झालेला असला तरी त्याची चव अजूनही अनेक खाद्य प्रेमिंच्या जिभेवर रेंगाळत आहे. लग्न, भंडारे व विविध कार्यक्रमात मोठ्या आवडीने बनवला जाणारा मसाले भात रेसिपी घरच्या घरी देखील सहज बनवता येऊ शकते.
आजच्या या लेखात आम्ही आपल्यासाठी सहज आणि सोप्या पद्धतीने घरच्या घरी, फार अधिक सामग्री न वापरता चविष्ट मसाले भात बनवण्याची मसाले भात रेसिपी शेअर करीत आहोत. ही Masale Bhat recipe in Marathi आपण स्वतः एकदा नक्की करून पहावी व या सुगंधित भाताचा सुगंध आणि चव संपूर्ण घरात घुमू द्यावी.
मसाले भात रेसिपी - Masale Bhat recipe in Marathi
Masale Bhat Recipe in Marathi
Ingredients
- 2 मोठे चमचे तेल
- 2 तमालपत्र
- 1 दालचिनी
- 2 इलायची
- 1 चक्रफूल
- 1 कप कापलेले कांदे
- 4-5 लवंगा
- 8-10 काळी मिरे
- 1 चमचा जिरे
- 1 चमचा आले लसूण पेस्ट
- अर्धा चमचा हळद पाऊडर
- अर्धा चमचा लाल मिरची
- 1 कप गाजर
- 1 कप बटाटे
- 1 कप वाटाणे
- 1 कप ढेमसे गोल भेंडी
- 1 कप फ्लॉवर
- 1 कप चवळीच्या शेंगा
- 1 कप टमाटे
- 1.5 चमचा गरम मसाले
- चवीनुसार मीठ
- 1 मोठी वाटी तांदूळ
- 2 मोठी वाटी पानी
- आवश्यकतेनुसार तूप
- कोथिंबीर
Instructions
- सर्वात आधी गॅसवर कढई ठेवावी. यानंतर कढईत दोन मोठे चमचे तेल घालावे.
- यानंतर 2 तमालपत्र तेलात सोडावे.
- तमालपत्रा नंतर दालचिनी चे एक तुकडे टाकावे.
- दोन तुकडे इलायची टाकावी. चंद्रफुल चे एक तुकडे टाकावे.
- चार ते पाच लवंगा टाकाव्यात.
- आठ ते दहा काळी मिरी टाकावी.
- एक लहान चमचा जिरे घ्यावे व ते देखील यात टाकावे.
- शेवटी 1 कप जाड बारीक चिरलेले कांदे टाकावेत व काही वेळ चमच्याच्या साह्याने ढवळावे.
- कांदे थोड्याफार प्रमाणात लाल झाल्यावर त्यात एक चमचा आलं आणि लसणाची पेस्ट टाकावी. पुन्हा एकदा चमच्याच्या साह्याने सर्व मिश्रण एकत्रित करावे.
- यानंतर अर्धा चमचा हळद पावडर टाका. सोबतच अर्धा चमचा मिरची पावडर टाकावी. आता पुन्हा चमच्याच्या साह्याने सर्व मिश्रण एकत्रित करावे.
- सर्व काही एकजीव झाल्यानंतर एक कप कापलेली गाजर घ्यावीत व ती देखील यात टाकावी.
- यानंतर एक कप कापलेले बटाटे टाकावे, एक कप वाटाणे टाकावे. आणि पुन्हा एकदा सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने एकत्र करावे.
- त्यानंतर एक कप कापलेली फ्लावर टाकावी.
- त्यानंतर एक कप वालाच्या शेंगा टाकाव्यात.
- आता काही वेळ सर्व मिश्रण व्यवस्थित रित्या तळून घ्यावे. यानंतर एक कप कापलेले टमाटे टाकावेत. परत एकदा सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे आणि कढई चे भांडे वरच्या बाजूने पाच मिनिटांसाठी झाकून द्यावे. यादरम्यान गॅस सुरू ठेवून पाच मिनिटे सर्व मिश्रण शिजु द्यावे.
- पाच मिनिटांनंतर झाकण उघडून दीड चमचा गरम मसाला टाकावा. मसाले भात मधील प्रमुख सामुग्री त्याचा मसालाच असतो म्हणून मसाला चांगल्या दर्जाचा वापरावा. यानंतर चवीनुसार मीठ टाकावे व सर्व मिश्रण पुन्हा एकदा एकत्रित करून घ्यावे.
- सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर एक मोठी वाटी स्वच्छ धुतलेले तांदूळ टाकावे. यानंतर काही वेळ चमच्याच्या साह्याने तांदूळ व कढईतील इतर मिश्रण ढवळून घ्यावे. जेणेकरून सर्व मिश्रण व मसाले तांदळाला लागून जातील. यानंतर दोन मोठ्या वाटी येवढे पाणी घेऊन यात टाकावे.
- यानंतर कढईला वरून झाकावे आणि पंधरा ते वीस मिनिटे तांदूळ व मसाले भात मधील इतर सामुग्री शिजु द्यावी.
- पंधरा ते वीस मिनिटानंतर कढईचे झाकण उघडावे व आता कढईतील पाणी कमी झालेले असेल व शिजलेला भात आपणास पहावयास मिळेल. यानंतर या भातावर वरून आवश्यकतेनुसार तूप टाकावे. व गार्निशिंग करण्यासाठी कोथिंबीर चा वापर करावा.
- अशा पद्धतीने आपला मसालेभात तयार झालेला आहे. आपण हा भात गरम गरम सर्व्ह करू शकता व प्लेट मध्ये त्यावर सुंदर गार्निशिंग करून ताटाला लावू शकता.
Video
मसाले भात करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा
- जर आपण तांदूळ हॉटेल प्रमाणे चांगले फुलवू इच्छिता तर त्यासाठी आपणास एक गोष्ट करायला हवी. तांदूळ चांगले फुलवण्यासाठी तांदळाला काही वेळेपर्यंत गरम पाण्यात भिजवून ठेवावे. जेवढा अधिक वेळ आपण तांदूळ भिजवून ठेवणार तेवढेच जास्त ते फुलतील आणि दिसायला व स्वादाला छान होतील.
- तांदूळ चा वापर करण्याआधी त्यांना व्यवस्थित धुणे महत्त्वाचे आहे. कारण आजकाल अनेक तऱ्हेचे कीटकनाशक व औषधी पावडर लावलेली तांदुळे बाजारात विक्री येतात. ही तांदूळ खाऊन आपले आरोग्य बिघडू शकते. म्हणून मसाला भात रेसिपी ट्राय करण्या आधी तांदूळ गरम पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावेत.
मसाले भात ही अतिशय सहज आणि खूप कमी वेळात तयार होणारी भारतीय पद्धतीची डिश आहे. याशिवाय मसाले भात चवीला देखील स्वादिष्ट आणि उत्तम आरोग्याच्या दृष्टीने देखील उपयोगी असतो. कमी खर्चात तयार होणारा आणि प्रत्येकाला हवाहवासा वाटणारा मसालेभात आपण एकदा नक्की करून पाहावा.
या लेखात सांगितलेल्या मसाले भात रेसिपी (Masale Bhat recipe in Marathi) प्रमाणे बनवलेला मसालेभात तुम्हाला कसा वाटला व हा भात खाऊन तुमच्या कुटुंबीयांचे सदस्यांची काय प्रतिक्रिया आली हे सर्व आम्हाला कमेंट्स मध्ये लिहून नक्की पाठवा.
FAQ
उरलेला मसाले भात कसा ठेवावा(साठवायचा)?
अनेकांचा हा प्रश्न असतो की जर मसाले भात उरला तर काय करावे? उरलेला भात तुम्ही हवाबंद डब्यात ठेवू शकता. योग्यरित्या संग्रहित केलेला भात फ्रीजमध्ये 4-5 दिवस टिकून राहतो. परंतु आपणास लवकरात लवकर हा भात संपवण्याचा प्रयत्न ठेवायचा आहे.
उरलेला मसालेभात पुन्हा गरम कसा करावा?
जर आपला मसालेभात उरलेला असेल तर त्याला फ्रिजमध्ये ठेवून काही काळापर्यंत साठवता येते. जेव्हा आपण फ्रिज मधून भात बाहेर घेणार तेव्हा भात पुन्हा गरम करण्यासाठी एक तवा गॅसवर ठेवावा त्यात दोन चमचे तेल टाकून तेलावर भात टाकावा व त्याला चांगल्या पद्धतीने गरम करून घ्यावे.
मसाले भात मसाले न वापरता बनवता येऊ शकतो का ?
होय नक्कीच, जर आपल्याकडे मसाले नसतील किंवा काही कारणास्तव आपणास मसाले नको असतील तर आपण मसाली भात हा मसाले न टाकता देखील बनवू शकतात. व मसाले नसणाऱ्या भाताचा स्वाद आणि सुगंध देखील छानच असतो.
1 thought on “Spicy Masale Bhat Recipe In Marathi - मसाले भात रेसिपी”