सी फुड मध्ये अनेक प्रकारचे चविष्ट पदार्थ सामील आहेत. परंतु यापैकी सर्वात सोपी, चविष्ट आणि प्रत्येकाला आवडणारी कोळंबी हे सी फूड प्रसिद्ध आहे. कारण त्यामध्ये काटे नसतात, एकदम सॉफ्ट असल्याने लहान मुले किंवा अधिक वय झालेली लोकही सहज खाऊ शकतात.
याशिवाय कोळंबी पचनासाठी देखील सहज असते. आजच्या या लेखात आपण सहज आणि झटपट तयार होणारा कोळंबीचा मसाला व कोळंबीची रस्सा करी कशी बनवावी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तर चला सुरू करूया.
कोळंबी मसाला कसा बनवावा?
Maharashtrian Prawns Masala Recipe In Marathi
Ingredients
- कोळंबी 300 ग्रॅम
- मीठ चवीनुसार
- हळद पावडर
- लिंबाचा रस
- तेल
- बारीक चिरलेले कांदे
- कापलेले टमाटे
- लसुन
- आलं
- कोशिंबीर
- हिरव्या मिरच्या
- गरम मसाला
- चिंचेचे पाणी
Instructions
- कोळंबी आणल्यानंतर सर्वात आधी त्यावरील काळा धागा आपल्याला काढून टाकायचे आहे, असे केल्यास कोळंबी कडवट लागत नाही.याशिवाय बाजारातून आणलेल्या कोळंबीला स्वच्छ पाण्यात, स्वच्छ हातांनी धुवून घ्यावे.
- कोळंबीची मसाला रस्सा करी बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात 300 ग्रॅम कोळंबी घ्यावीत. चवीनुसार थोडे मीठ घालावे.
- यानंतर अर्धा चमचा हळद घालावी.
- दोन चमचे लिंबाचा रस टाकावा. आता सर्व मिश्रण चमच्याच्या मदतीने एकत्रित करून घ्यावे.
- कोळंबींना चांगल्या पद्धतीने मीठ, हळद आणि लिंबाचा रस लागू द्यावा. यानंतर ही कोळंबी एका तासासाठी बाजूला ठेवून द्यावीत.
- आता आपण मसाला बनवणार आहोत. करी मसाला बनवण्यासाठी एका तव्यात दोन मोठे चमचे तेल घ्यावे. यानंतर एक कप बारीक चिरलेले कांदे टाकावे.
- थोडा वेळ कांद्यांना चांगल्या पद्धतीने हलक्या आचेवर तळून घ्यावे.
- यानंतर तव्यात 1 कप चिरलेले टमाटे टाकावे. टमाटे आणि कांदे मऊ होत नाही तोपर्यंत त्यांना गरम करावे. यादरम्यान कांदे आणि टमाटे मोठ्या चमचा च्या साह्याने वर खाली पालटत राहावे.
- यानंतर तवा झाकनाने झाकून दोन मिनिटांपर्यंत कांदे व टमाटे शिजवावे. दोन मिनिटे झाल्यानंतर झाकण उघडून घ्यावे. आता या मिश्रणात आठ ते दहा लसूण घालावेत.
- 1 इंच आल्याची तुकडे करून त्यांना देखील टाकावे. एक कप कोशिंबीर आणि दोन हिरव्या मिरच्या टाकाव्यात.
- यानंतर पुन्हा मोठ्या चमचा च्या साह्याने सर्व मिश्रण एकत्रित करावे. आता पुन्हा एकदा तव्यावर झाकण ठेवून पाच मिनिटांपर्यंत गरम शिजु द्यावे.
- पाच मिनिटे पूर्ण झाल्यावर गॅस बंद करावा व सर्व मिश्रण मिक्सर च्या भांड्यात काढून घ्यावे आणि मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यावे. यानंतर एका कढईत अर्धा चमचा तेल गरम करण्यास घ्यावे.
- व मिक्सर मध्ये बारीक केलेला सर्व मसाला या तेलात घालावा. दोन मिनिटांपर्यंत चांगल्या पद्धतीने तेल आणि मसाला मिक्स करून घ्यावा.
- मसाला आणि तेल एकमेकात एकजीव झाल्यानंतर चवीनुसार थोडे नमक घालावे. यानंतर 2 चमचे मिरची पावडर, अर्धा चमचा हळद पावडर आणि अर्धा ते एक चमचा गरम मसाला टाकावा.
- पुन्हा एकदा चमच्याच्या मदतीने सर्व मिश्रण मिक्स करावे.
- आता मीठ, हळद आणि लिंबाचा रस लावून ठेवलेली कोळंबी मसाल्यात टाकावी. आता सर्व कोळंबी मसाल्या सोबत मिक्स करून घ्यावी. आता आपल्याला कढईत पाणी टाकायचे आहे.
- यासाठी आपण मिक्सर च्या, ज्या भांड्यात मसाला केला होता त्यात पाणी टाकून चिटकलेला सर्व मसाला काढून तेच पाणी कढईत टाकू शकतात.
- आता चमच्याच्या मदतीने एकजीव करत दोन मिनिटांपर्यंत सर्व मिश्रण एकत्रित करावे. यानंतर काही वेळ कोळंबी शिजु द्यावीत. यात आपण उत्तम स्वादासाठी चिंचाचे पाणी घालू शकतात.
- काही वेळ शिजवल्यानंतर, शेवटची काही मिनिटे आधी कापलेली कोशिंबीर टाकून गार्निशिंग करावी.
- आणि अशा पद्धतीने आपली कोळंबीची मसाला करी तयार आहे. आता आपण गरमागरम कोळंबी सर्व्ह करू शकतात.
Video
Notes
FAQ
कोळंबी खाणे शरीरासाठी चांगले आहे का?
कोळंबी मध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन आणि काही आवश्यक विटामिन व मिनरल्स असतात. कमी कॅलरी आणि हेल्दी कोलेस्ट्रॉल असलेली कोलंबी खाणे प्रत्येकासाठी पोषक आहे. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये कोळंबी खाल्ल्याने एलर्जी, गळा दुखणे, श्वास घेण्यात अडचण होणे व पोटात दुखणे यासारख्या समस्या होऊ शकतात.
कोळंबी ची करी तिखट कशी बनवावी?
तिखट कोळंबी चा स्वाद अधिक चांगला लागतो. म्हणून जर आपण कोळंबी तिखट करू इच्छिता तर त्यासाठी 2 हिरव्या मिरच्यांच्या जागी 3-4 किंवा त्यापेक्षा जास्त मिरची टाकाव्यात. व याशिवाय मसाला आणि चटणी चे प्रमाण देखील वाढवावे.
करी किती वेळेपर्यंत संग्रहित केली जाऊ शकतात
करी जास्त वेळ संग्रहित करून ठेवू नये. फ्रीज मध्ये अधिक काळापर्यंत ठेवल्यास करी चा स्वाद बदलू शकतो. म्हणून आवश्यकता असेल तेवढीच करी बनवावी. परंतु स्टोअर करणे अति आवश्यक असल्यास आपण 1 ते 2 दिवसांपर्यंत फ्रीज मध्ये स्टोअर करू शकतात.
कोळंबी मसाला करत असतांना पुढील गोष्टी लक्षात ठेवा
कोळंबीचा मसाला बनवत असताना उत्तम चव येण्यासाठी काही लहानसहान गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.
अधिक शिजवणे
कोळंबी नाजूक असतात आणि म्हणून कमी पुरेश्या वेळेत शिजु शकतात. म्हणून त्यांना मायक्रोवेव्हमध्ये किंवा गरम पाण्यामध्ये वितळणे चुकीचे आहे. कोळंबी स्वच्छ करण्यासाठी आपण साधे पाणी अथवा हलके कोमट पाणी वापरू शकता.
व्यवस्थित स्वच्छ न करणे
कोळंबी व्यवस्थित स्वच्छ न केल्यास त्यांचा स्वाद कडवट लागू शकतो. कोळंबी आणल्यानंतर सर्वात आधी त्यावरील काळा धागा आपल्याला काढून टाकायचे आहे, असे केल्यास कोळंबी कडवट लागत नाही. याशिवाय बाहेरून आणलेल्या कोळंबीला स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावे.
शेवट
तर मंडळी या लेखात आम्ही आपल्यासोबत कोळंबी ची मसाला करी काशी बनवायची याची संपूर्ण रेसीपी शेअर केली. आशा करतो आपणास कोळंबी बनवण्यासाठी ही माहिती उपयोगाची ठरणार आहे.
जर आपणही ही करी बनवून पहिली असेल तर आपले अनुभव कमेन्ट द्वारे नक्की शेअर करा. आपले काही प्रश्न असतील तर ते देखील आपण आम्हाला कमेन्ट करून विचारु शकतात.